त्र्यंबकेश्वर येथे महादेवाचे जागृत ज्योतिर्लिंग आहे. येथे महादेव स्वतः ज्योतिर्लिंगाच्या स्वरूपात प्रकट झाले होते. त्र्यंबकेश्वर जवळून वाहणारी गोदावरी नदी हि पवित्र गंगे चे रूप आहे. गंगेच त्र्यंबकेश्वर येथे उगम पवण्यामागे एक कथा आहे. त्र्यंबकेश्वर चे ज्योतिर्लिंग ब्रह्मादेव, महादेव आणि विष्णू देव चे प्रतीक आहे. पवित्र गोदावरी नदी आणि त्र्यंबकेश्वर मधील त्रिमूर्तींचा वास यामुळे त्र्यंबकेश्वर ची भूमी हि पवित्र झाली आहे. हिंदू धर्मातील लोक येथे अनेक शुभ कार्य करण्यासाठी येत असतात, कुंडलीतील दोषांतून मुक्तता मिळवण्यासाठी अनेक पूजा अर्चा येथे होत असतात. असे म्हणतात त्र्यंबकेश्वर चा भूमीवर केलेल्या पूजेचे फळ लवकर मिळते आणि आपली कुंडलीतील दोषांची पूर्तता होते.
नारायण नागबली पूजा :
नारायण नागबली हि पितृ दोष निवारणासाठी केली जाणारी अतिशय महत्वाची पूजा फक्त त्र्यंबकेश्वर येथील अहिल्या गोदावरी संगम आणि सती महास्मशान येथे केली जाते. नारायण नागबली या पूजेमध्ये दोन प्रकारचा पूजांचा समावेश असतो १) नारायण बली पूजा २) नागबली पूजा .
या दोन्ही पूजा वेग वेगळ्या असल्या तरीही या दोन्ही पूजा एकत्र केल्या जातात जिला आपण नारायण नागबली पूजा या नावाने ओळखतो आणि तिलाच पितृ दोष निवारण पूजा असेही म्हणतात. नारायण बली पूजा हि पितृ दोष निवारणासाठी आणि नागबली पूजा हि नागदेवता म्हणजेच साप मारल्याचा पापातून मुक्ती मिळवण्यासाठी केली जाते.
पितृ दोषामुळे माणसाचा आयुष्यात अनेक अडचणी निर्माण होत असतात. पितृ दोष हा नैराश्य, आर्थिक हानी, वैवाहिक जीवनात अडचणी, यश मिळवण्यात अडचणी अशा अनेक गोष्टींमध्ये बाधा बनतो. नारायण नागबली पूजेमुळे जीवनात सकारात्मकता निर्माण होते आणि आपल्या पूर्वजांचा आत्म्यांना शांती मिळते त्यांना मोक्ष प्राप्ती होते आणि आपले जीवन सुखी समाधानी बनते. एखाद्या व्यक्तीची आत्महत्या, अपघात , आजारपण अशा गोष्टींमुळे जेव्हा अचानक मृत्यू होतो तेव्हा त्या व्यक्तीचा अनेक इच्छा अपूर्ण राहिलेल्या असतात आणि त्यासोबतच त्या व्यक्तीने त्याचा आयुष्यात केलेल्या पापं यांमुळे त्याला मरणानंतर मोक्ष प्राप्ती होण्यास अडचणी निर्माण होतात. अशा अतृप्त आत्मा त्यांचा पुढील जीवनात अनेक अडचणी निर्माण करतात. नारायण नागबली पितरांचा आत्म्यांना सद्गती मिळवून देते आणि आपल्याला पितरांचे आशीर्वाद हि मिळून देते. त्यामुळे हिंदू धर्मात नारायण नागबली पूजेला खूप महत्व आहे.
त्र्यंबकेश्वर मध्ये ताम्रपत्रधारी पंडितांचा हातून नारायण नागबली पूजा पूर्ण केली जाते आणि पूजेसाठी तीन दिवसांचा कालावधी लागतो.
काल सर्प दोष पूजा :
जर एखाद्या व्यक्तीने त्याचा मागील आयुष्यात किंवा चालू असलेल्या आयुष्यात नागदेवता म्हणून पुजल्या जाणाऱ्या सापाला इजा केली असेल तर त्या व्यक्तीला काल सर्प दोष भोगावाच लागतो. काल सर्प दोष आपल्या कुंडलीतील ग्रहांचा स्थितीवरून ठरवला जातो. आणि काल सर्प दोष होण्या मागे दोन ग्रह कारणीभूत असतात १) राहू २) केतू. जेव्हा आपल्या जन्मपत्रिकेत राहू आणि केतू या दोन ग्रहांचा मध्ये बाकी सर्व ग्रह दाखवत असतील तर त्या व्यक्तीला काल सर्प दोष असल्याचे समजते. राहू आणि केतू हे ग्रहमालेतील नकारात्मक ग्रह आहेत आणि हे दोन ग्रह इतर ग्रहांवर हि त्यांचे नकारात्मक प्रभाव दाखवतात. या ग्रहांचा प्रभाव व्यक्तीला त्याचा यशापासून दूर ठेवतो, अतिशय कठीण असे जीवन बनवतो. काल सर्प दोष असलेली व्यक्ती नेहमी आर्थिक हानी, नैराश्य, निरोगी जीवन, एकटेपणा अशा समस्यांना सामोरे जात असते. ज्योतिष शास्त्रात १२ प्रकारचे काल सर्प दोष सांगितले आहेत आणि या १२ प्रकारांचे प्रभाव वेग वेगळे असतात.
काल सर्प दोषाचे १२ प्रकार : अनंत , कुलिक, वासुकी, शंखपाल, पद्मा, महापद्म, तक्षक, कर्कोटक, शंखचूड, घातक, विषधार, शेषनाग
Bình luận