top of page

त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर



एक प्राचीन तीर्थस्थान त्र्यंबकेश्वर हे महाराष्ट्रातील नाशिक या शहरात स्थित आहे. नाशिक मधील सह्याद्री पर्वत रांगेतील ब्रह्मगिरी पर्वत रांगेत त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर वसलेले आहे. हेच ब्रह्मगिरी पर्वत पवित्र गंगा नदीचे उगम स्थान आहे. ब्रह्मगिरी पर्वतावर उगम पावणारी गंगानदी आज गोदावरी म्हणून ओळखली जाते. वारकरी संप्रदायातील लोकांचे श्रद्धा स्थान असलेले निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिर त्र्यंबकेश्वर मंदिराजवळच आहे.


त्र्यंबकेश्वर पर्वतावर गौतम ऋषींचे आश्रम होते. त्यांच्यावर एकदा गौहत्येचा पाप लागला होता. त्या गौ हत्येचा पापातून मुक्त होण्यासाठी त्यांनी या पर्वतावर महादेवाची तपस्चर्या केली होती. महादेव जेव्हा गौतम ऋषींचा प्रार्थनेने प्रसन्न झाले आणि प्रकट झाले तेव्हा गौतम ऋषी गंगा धर्तीवर प्रकट करण्याची इच्छा व्यक्त केली होती. असे म्हणतात गंगेचा पवित्र पाण्यात अंघोळ केल्याने माणसाचे सर्व पाप धून निघतात. गौतम ऋषींना त्यांचे गौ हत्येचा पापातून मुक्त व्हायचे होते. महादेव गौतम ऋषींची हि इच्छा मान्य करतात आणि धर्तीवर गंगा अवतरित करतात. गौतम ऋषी गंगेचा पवित्र पाण्यात स्नान करून पाप मुक्त होतात. त्र्यंबकेश्वर मंदिरापासून ४०० किलोमीटर चा अंतरावर असलेले कुशावर्त कुंड हे गंगा नदीचे दुसरे उगम स्नान आहे. ब्रह्मगिरी पर्वतावरून लुप्त झालेली गंगा या कुशावर्त कुंडाचा जागेवरून पुन्हा उगम पावते. देव विदेशातून लोक कुशावर्त कुंडाचा पाण्यात स्नान करण्यासाठी त्र्यंबकेश्वर ला येत असतात. १२ वर्षातून एकदा भरणारा नाशिक मधील कुंभ मेळा त्र्यंबकेश्वर येथे भरतो तेव्हा लाखो भाविक गंगेचा पाण्यात डुबकी मारण्यासाठी येथे येत असतात.


त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंग हे भारतातील इतर ११ ज्योतिर्लिंगांपेक्षा खुप वेगळे आहे. त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंग हे त्रिमुखी आहे जे ब्रह्मा देव, विष्णू देव आणि महादेवाचे प्रतीक आहे. म्हणूनच हे ज्योतिर्लिंग त्रियंबक म्हणून ओळखले जाते. फार दुरून शिवभक्त येथे दर्शनासाठी येत असतात. जे लोक येथे दर्शनासाठी येऊ शकत नाही त्यांचा साठी त्र्यंबकेश्वर मंदिर चा ऑफिसिअल वेबसाईट वे लाइव्ह स्ट्रीमिंग दर्शन फॅसिलिटी सुरु केली आहे. लाईव्ह दर्शन मध्ये तुम्हाला ताम्रपत्रधारी पंडित सतत ज्योतिर्लिंगाचे पूजा करताना दिसतील. त्र्यंबकेश्वर या ठिकाणी फक्त ताम्रपत्रधारक अधिकृत पंडितच पूजा करू शकतात.


त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्याची वेळ हि सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत आहे.


त्र्यंबकेश्वर मधील अधिकृत ताम्रपत्रधारी पनंदिताचा इतिहास :


त्र्यंबकेश्वर ची भूमी हि फार पवित्र समजली जाते. येथे केले जाणारे पूजा कार्य हे खूप लवकर सफल होतात. हिंदू धर्मातील लोक त्र्यंबकेश्वर येथे पूजा करण्यासाठी जात असतात. त्र्यंबकेश्वर काल सर्प दोष, नारायण नागबली, कुंभ विवाह, त्रिपिंडी श्राद्ध, रुद्राभिषेक पूजा, महाम्रीत्युन्जय मंत्र जाप इत्यादी पूजांसाठी प्रसिद्ध आहे. लोक आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी, आपल्या कुंडलीतील दोष दूर करण्यासाठी त्र्यंबकेश्वर येथे पूजा करतात.

त्र्यंबकेश्वर येथे प्रत्येक पूजा फक्त ताम्रपत्रधारी पंडितच करतात. ताम्रपत्रधारी पंडित हे त्र्यंबकेश्वर येथील अस्सल, अधिकृत आणि सर्वात अनुभवी पंडित आहेत.


श्री नानासाहेब पेशवा यांनी त्र्यंबकेश्वर मध्ये राहणाऱ्या भरपूर ज्ञान असणाऱ्या पंडितांना ताम्रपत्रे दिले होते. तेव्हा पासून पिढ्यानु पिढ्या ते ताम्रपत्रे सांभाळून ठेवण्यात आले आहे. आज ज्यांचा जवळ हे ताम्रपत्रे आहेत फक्त तेच पंडित त्र्यंबकेश्वर मध्ये पूजा करू शकतात.


त्र्यंबकेश्वर मध्ये केल्या जाणाऱ्या पूजा :


काल सर्प दोष :

काल सर्प दोष हा खूप नकारात्मक दोषांपैकी एक आहे. कुंडलीतील ग्रहांचा अचूक स्थिती मुळे काल सर्प दोष उद्भवतो. जेव्हा इतर सर्व ग्रह राहू आणि केतू या दोन ग्रहांचा मध्ये येतात तेव्हा काल सर्प दोष उद्भवतो. एकूण १२ प्रकारचे काल सर्प दोष असतात जे ग्रहांचा स्थितीवरून ठरवले जातात. त्र्यंबकेश्वर मधील काल सर्प दोष पूजा हि खूप फलदाई ठरते. काल सर्प दोष पूजा हि त्या दोषापासून होणाऱ्या वाईट परिणामांपासून माणसाचे सौरक्षण करते.


नारायण नागबली :


नारायण नागबली हा एक पितृ दोष निवारण विधी आहे. हिंदू धर्मातील सर्वात महत्वाचा पूजांपैकी एक म्हणजे नारायण नागबली पूजा. नारायण नागबली पूजा हि फक्त त्र्यंबकेश्वर येथील अहिल्या गोदावरी संगम आणि सतीमहास्मशान येथे केली जाते. ताम्रपत्रधारी पंडित हे नारायण नागबली पूजा करण्यासाठी सर्वात योग्य म्हणले जातात. त्यांचा सोबतची पूजा तुम्हाला पूजेचा सर्वात धार्मिक अनुभव मिळवून देते.


त्रिपिंडी श्राद्ध पूजा :


एखाद्या व्यक्तीचा मरणानंतर त्या व्यक्तीचा दार वर्षी श्राद्ध विधी होणे फार महत्वाचे मानले जाते. जर व्यक्तीचा श्राद्ध विधी सलग ३ वर्ष कोणत्यातरी कारणास्तव होऊ शकला नाही तर त्या व्यक्तीची आत्मा दुखी होते आणि तिला सद्गती प्राप्ती होत नाही. अशा आत्मा पुढील पिढीचा आयुष्यात समस्या निर्माण करू शकतात. मरण पावलेल्या व्यक्तीचा आत्म्याला शांती मिळावी, आणि त्या व्यक्तीचे आशीर्वाद प्राप्ती करून घेण्यासाठी त्रिपिंडी श्राद्ध पूजा केली जाते. त्रिपिंडी श्राद्ध हा पिंड दान विधी असतो.


या व्यतिरिक्त कुंभ विवाह, रुद्राभिषेक पूजा, महाम्रीत्युन्जय मंत्र जाप पूजा, शांती पूजा, होम, अभिषेक अशा अनेक पूजा त्र्यंबकेश्वर मध्ये ताम्रपत्रधारी पंडित यांचा मार्गदर्शनाखाली केल्या जातात.


महाशिवरात्री हा त्र्यंबकेश्वर मध्ये साजरा केला जाणारा सर्वात मोठा सण आहे. या दिवशी लाखोंचा संख्येत त्र्यंबकेश्वर मध्ये भाविकांची गर्दी पाहायला मिळते. या दिवशी लोक रात्र भर महादेवाची आराधना करत जागरण करतात. मोठी जत्रा या ठिकाणी भरते. महाशिवरात्री व्यतिरिक्त पालखी सोहळा, रथ पूजा, त्रिपुरी पौर्णिमा असे अनेक सण त्र्यंबकेश्वर मध्ये साजरे केले जातात.


त्र्यंबकेश्वर मंदिर ला भेट द्यायला गेल्यावर तुम्ही ब्रह्मगिरी डोंगर, कुशावर्त कुंड, अंजनेरी हिल्स, निवृत्तीनाथ महाराज यांची समाधी, श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, सप्तशृंगी देवी टेम्पल, शिर्डी साई बाबा मंदिर या ठिकाणांना हि भेट देऊ शकता.





.



3 views0 comments
bottom of page