top of page

काल सर्प दोष म्हणजे काय ? त्र्यंबकेश्वर मध्ये केल्या जाणाऱ्या काल सर्प दोष पूजेचे फायदे.


काल सर्प दोष :


काल सर्प दोष हा ग्रह मालेतील दोन नकारात्मक ग्रह राहू आणि केतू यांचा प्रभावामुळे उद्भवतो. जेव्हा आपल्या कुंडलीत राहू आणि केतू इतर सर्व ग्रहांना घेरतात म्हणजेच सर्व ग्रह या दोन ग्रहांचा मध्य भागी येतात तेव्हा काल सर्प दोष असल्याचे सांगितले जाते. काल सर्प दोष हा सुख, आनंद, यश हिरावून घेणारा दोष मानला जातो. या काल सर्प दोषामुळे सर्व कार्यांमध्ये अपयश येणे, नेहमी संघर्षांचा सामना करावा लागणे, एकटेपणा वाटणे इत्यादी अनेक समस्या निर्माण होत असतात. काल सर्प दोष माणसाला त्याचा सुखा पासून नेहमी दूर ठेवतो. काल सर्प दोष हा विपरीत काल सर्प दोष म्हणूनही ओळखला जातो.


काल सर्प दोषाचे १२ प्रकार ज्योतिष शास्त्रात सांगितले आहेत. प्रत्येक काल सर्प दोषाचे व्यक्तीचा आयुष्यावर वेग वेगळ्या रीतीने परिणाम होत असतात. काही काल सर्प दोषाचे चांगले परिणाम पाहायला मिळतात तर काही चे नकारात्मक परिणाम पाहायला मिळतात.


काल सर्प दोषाचे प्रकार :


१) अनंत काल सर्प दोष

२) कुलिक काल सर्प दोष

३) वासुकी काल सर्प दोष

४) शंखपाल काल सर्प दोष

५) पद्म काल सर्प दोष

६) महापद्म काल सर्प दोष

७) तक्षक काल सर्प दोष

८) कर्कोटक काल सर्प दोष

९) शंखचूड काल सर्प दोष

१०) घातक काल सर्प दोष

११) विषधर काल सर्प दोष

१२) शेषनाग काल सर्प दोष


काल सर्प दोष चे आयुष्यावर होणारे परिणाम कमी करण्यासाठी काल सर्प दोष निवारण पूजा करण्यास सांगितली जाते. काही लोक गुरुजींनी सुचवलेली पूजा करणे टाळतात आणि त्यामुळे त्यांना आयुष्यभर काल सर्प दोषाचे भयानक परिणाम भोगावे लागतात. असे म्हणतात काल सर्प दोष पूजा करूनही हा दोष पूर्ण पने आपल्या आयुष्यातून निघून जात नाही. पण काल सर्प दोष पूजेमुळे त्या दोषाचे आयुष्यावर होणारे वाईट परिणामांचा प्रभाव कमी होतो. काल सर्प दोषाचे माणसाचा आयुष्यावर होणारे परिणाम हे त्याने मागील जन्मात केलेल्या किंवा अता करत असलेल्या कर्मानवर देखील निर्भर असतात. माणसाने जर मागील जन्मात किंवा चालू असलेल्या आयुष्यात नाग देवता (सापाला) मारले असेल, इजा केली असेल तर त्या व्यक्तीला काल सर्प दोष भोगावाच लागतो.


काल सर्प दोष पूजा करण्या साठी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर हे उत्तम तीर्थ क्षेत्र आहे. हे महादेवाचा सर्वात पवित्र मंदिरांपैकी एक मंदिर आहे. येथे पूजा केल्याने तुम्हाला पूजेचे लाभ लवकर मिळतात. त्र्यंबकेश्वर ला सर्वदोषनिवारक स्थान म्हणून हि लोक ओळखतात. हिंदू लोक त्र्यंबकेश्वर येथे अनेक प्रकारचा पूजा करण्यासाठी येतात १) नारायण नागबली २) त्रिपिंडी श्राद्ध पूजा ३) कुंभ विवाह ४) पितृ दोष निवारण ५) रुद्राभिषेक ६) महाम्रीत्युन्जय मंत्र जाप पूजा ७) हवन ७) अभिषेक इत्यादी


काल सर्प दोष पूजा त्र्यंबकेश्वर मधील ताम्रपत्रधारी पंडित चा हातूनच करावी. ताम्रपत्रधारी पंडित त्र्यंबकेश्वर मधील खरे ज्ञानी पंडित आहेत. काल सर्प दोष पूजेला ३ तासाचा कालावधीत लागतो आणि पंडितजी तुमहाला पूजेसाठीचा योग्य तो मुहूर्त सांगतील. अमावस्या चा काळ काल सर्प दोष पूजेसाठी चांगला मानला जातो.




3 views0 comments
bottom of page